News Portal

बजाज पुणे ग्रँड टूरचा सुरुवातीचा टप्पा उत्साहात

 

 

पुणे: आजपासून सुरू झालेल्या पाच दिवसांच्या स्पर्धेत युरोप, आशिया, ओशनिया आणि आफ्रिका येथून आलेल्या २८ संघांमधील सायकलपटू ४३७ किलोमीटर लांबीच्या कठीण मार्गावर आपली क्षमता पणाला लावणार आहे.

 बजाज पुणे ग्रँड टूर ही भारतातील पहिली पाच दिवसांची, बहुपर्यायी पुरुषांसाठीची आंतरखंडीय सायकलिंग स्पर्धा असून, जागतिक व्यावसायिक सायकलिंगमध्ये भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

 ४३७ किलोमीटरच्या या कठीण मार्गावर पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २९ संघांमधील १७१ आघाडीचे सायकलपटू सहभागी होत आहेत. ही स्पर्धा ९ तालुके आणि १५० गावांमधून जात पुण्याचा सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि ग्रामीण पर्यटन अधोरेखित करणार आहे.

बजाज पुणे ग्रँड टूरचा सुरुवातीचा टप्पा हा एक अतिशय लहान, वैयक्तिक वेळ चाचणी आहे जो पहिल्या टप्प्याच्या एक दिवस आधी आयोजित केला गेला. दुपारी दीड वाजता डेक्कन जिमखाना येथील गुडलक हाॅटेल जवळील चौकात हा टप्पा सुरू झाला. दुपारी साडेचार वाजता साडेसात किलोमीटरचे अंतर कापून डेक्कन जिमखाना बस स्थानकाजवळ तो संपला.