News Portal

बारामतीत विमान कोसळल्यानंतर ४ ते ५ स्फोट

भीषण आगीत होरपळून अजित पवारांसह ५ जण मृत्युमुखी ; दोन महिलांचा समावेश 



 

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पिछेहाट होऊनही, आणि खिल्ली उडविली जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न खचता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केली होती. त्या संदर्भातील बैठकीसाठी येत असतानाच अकल्पित दुर्घटनेत या उमद्या नेतृत्वाला काळाने हिरावून घेतले. विमान कोसळून ४ ते ५ मोठे स्फोट झाले. मोठी आग लागली. त्यामुळे बचावासाठी सुध्दा कोणी धावू शकले नाही.

अजित पवारांसह विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमान चालक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक हे दुर्घटनेत मरण पावले.

अजित पवारांच्या विमानाला अपघात होऊन ते दगावल्याची बातमी बुधवारी सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी ठरत आहे. आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. 'एव्हीआय ग्राऊंड रिऍलिटीज' या खासगी कंपनीचे हे विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरुन आले असताना भीषण अपघात झाला.
बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते.


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका आहे.
विमान जाणूनबुजून सदोष ठेवले होते की, त्यात काही तांत्रिक बिघाड होता की, हा काही राजकीय कट होता, याची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून आणि मानवाधिकार आयोगाकडून चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी होत आहे.