News Portal

पुण्याच्या महापौर पदी गणेश बिडकर?

 

पुणे : मतमोजणीपूर्वीच शहरातील काही भागात 'जय श्रीराम ' असा सूचक आशय व्यक्त करणारे फलक झळकले असून पुण्यातील भाजपचे शहर निवडणूक प्रमुख असलेल्या गणेश बिडकर यांचे महापौर म्हणून अभिनंदन करणारे फलक झळकले आहेत.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये  बिडकर रिंगणात असून त्यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांच्या मुलाच्या,प्रणव धंगेकर यांच्या उमेदवारीमुळे पुण्यातील लक्षवेधी लढतींपैकी ही एक लढत मानली जात आहे.

 गणेश बिडकर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते, तसेच पुणे महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. २०१७ मध्ये बिडकर हे महापालिकेत भाजपचे सभागृह नेते देखील राहिलेले आहेत.

दरम्यान, सदाशिव पेठेत राघवेंद्र उर्फ बापू मानकर, वारजे भागात सचिन दोडके यांचे अभिनंदन करणारे फलक झळकले आहेत. धायरीत जय श्रीराम असा फलक आहे. या भागात राजू लायगुडे व हरिदास चरवड हे माजी नगरसेवक भाजपचे उमेदवार आहेत.

दरम्यान, महापौरपदाचे आरक्षण अद्याप निश्चित झाले नाही. तथापि बिडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा निवडणूक सुरु होण्यापूर्वी आहे.