भारतीय गुणवत्ता परिषदेचे ई-गव्हर्नन्स सुधारणेबाबत राज्यभरात मूल्यमापन
मुंबई: १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले असून २९ महानगरपालिकांचाही यात समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्वोत्तम आयुक्तांसाठी असलेल्या २०० पैकी १८६.२५ गुण मिळवले आहेत.
कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड यासाठी करण्यात आली आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दि. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतील. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे अशी :
.jpeg)
