१ महापौर,१ स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश
पुणे: एक महापौर, २ स्थायी समिती अध्यक्ष, ६ गट नेते, ३ विरोधी पक्षनेते , ५ स्थायी समिती सदस्य अशा एकूण १६ माजी माननीयांना यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत घरी बसावे लागले आहे.
पराभवाची झळ बसलेल्यांमध्ये एकेकाळचे महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम आहेत. पूर्वीचे सभागृह नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष जगताप आहेत. वसंत मोरे हेही 'मनसे' चे विरोधी पक्षनेता व गटनेता होते.
माजी विरोधी पक्षनेत्यांपैकी काॅंग्रेसचे आबा बागुल , राष्ट्रवादीच्या दिपाली धुमाळ, मनसेचे साईनाथ बाबर, किशोर शिंदे, बाबू वागसकर शिवसेनेचे अशोक हरणावळ आणि संजय भोसले, हे पराभूत झाले आहेत.
पूर्वीच्या सभागृहातील स्थायी समिती सभासदांपैकी अविनाश बागवे
नंदाताई लोणकर,योगेश ससाणे, नाना भानगिरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
रूपाली पाटील शहर सुधारणा समिती अध्यक्ष होत्या. राष्ट्रवादीचे शंकर केमसे माजी सभागृह नेता होते.
२०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल, या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले. हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले, असा या माजी माननीयांचा आरोप आहे.













