पुणे: पुणे महानगरपालिकेतील काॅंग्रेसच्या गटनेते पदी चंद्रकांत कदम यांची निवड झाली. भाजपच्या गटनेते पदी अपेक्षित गणेश बिडकर यांची तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेते पदी काका चव्हाण यांची निवड झाली.
काका चव्हाण १९ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बिडकर पाचव्या वेळी निवडून आले असून यापूर्वी स्वीकृत नगरसेवक असताना सभागृह नेते होते.