News Portal

सद्गुरु जंगली महाराज यांच्या १३६ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १ एप्रिल पर्यंत महोत्सव

पुणे: सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३६ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, प्रसिद्ध गायक, कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम तसेच प्रतिदिनी सायंकाळी ६.०० ते ७.१५ पर्यंत विद्वानांची व्याख्याने असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके १९४८, गुरुवार दि. १९ मार्च  (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध चतुर्दशी, बुधवार दि. १ एप्रिल २०२६ अखेर, मंदिरात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज पहाटे समाधीला अभ्यंगस्नानानंतर आढाव बंधू यांचे सनईवादन झाले. श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळातर्फे आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण आदी कार्यक्रम झाले.

बुधवार दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ वा. श्री सद्‌गुरु जंगली महाराजांच्या यांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक, श्री सद्‌गुरू जंगली महाराज भजनी मंडळासह, श्रीरोकडोबा मंदिर शिवाजीनगर गावठाण, येथून निघून समाधी मंदिरात येईल. नंतर महोत्सवाची दुसऱ्या दिवशी महाप्रसादाने सांगता होईल.