Breaking News Latest updates loading...

मराठी माणूस एकत्र येऊच शकणार नाही अशी पध्दतशीर व्यवस्था

राज ठाकरे यांचे प्रतिपादन 



पुणे: महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थिती शला सगळे राजकारणी कारणीभूत आहेत. वेगवेगळे वाद निर्माण करुन मराठी माणूस एकत्र येऊच शकणार नाही अशा प्रकारे व्यवस्था पद्धतशीरपणे करून ठेवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या वर्षी राज ठाकरे यांचे व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते.  'माझ्या मनातला महाराष्ट्र आणि मराठी माणूस ' हा त्यांचा व्याख्यान विषय होता.
अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक होते.

महाराष्ट्रात येऊन कोणी काही वक्तव्य करते अशा शब्दांमध्ये बागेश्वर बाबा यांचे नाव न घेता टीका करत ठाकरे यांनी त्यांची नक्कल केली. महाराष्ट्रातल्या संतांनी जात जाती धर्म भेद दूर करण्याचे काम केले परंतु ते आपण विसरलो आहोत. आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो त्यांनी दिलेल्या विचार मात्र पूर्णपणे विसरलेलो आहोत, असे ते म्हणाले. 

तामिळनाडू पश्चिम बंगाल मधल्या हिंदीला नकार देणाऱ्या नागरिकांसारखा, भाषिक कडवटपणा असल्याशिवाय मराठी भाषा आपण टिकवू शकणार नाही, असेही ते म्हणाले.