Breaking News Latest updates loading...

खरात याला प्रत्यक्ष साथ दिल्याबद्दल रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

 प्रा. श्याम मानव यांची मागणी 


पुणे: अशोक खरात प्रकरणात एका पत्रकाराने त्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला असताना त्याला धमकी देऊन खरात याला प्रत्यक्ष साथ दिल्याबद्दल रुपाली चाकणकर यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे,अशी मागणी 
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आज येथे केली.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 'बुवा तेथे बाया' या सदरात 'खरातसारख्या भोंदू बाबाला स्त्रिया का फसतात' या विषयावर प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

पुण्यात एकेकाळी बुवाबाजीचा भांडाफोड करण्यासाठी मी, जयदेव डोळे आणि नीलम गोऱ्हे पुढाकार घेत असू, त्याच नीलम गोऱ्हे यांचे नाव खरात प्रकरणात येणे हे दुर्दैवी आहे, अशी खंतही मानव यांनी व्यक्त केली.

टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रवक्ते विकास लवांडे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे व्यासपीठावर होते.