अन्य नेत्यांची चुप्पी असताना सामान्यांना होणाऱ्या त्रासावर ठेवले बोट
पुणे: बहुतांश राजकीय नेते पुण्यासह महाराष्ट्रात वाढलेल्या गुन्हेगारी विषयी चिडीचूप असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'कसल्या रे त्या कोयता गॅंग?' असा प्रश्न उपस्थित करत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना जाहिरपणे सुनावले होते. त्यानंतर प्रश्न विधानसभेतही हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा दक्ष होऊन कोयता गॅंग तोडफोड गॅंगचा उपद्रव कमी झाला.
कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री या नात्याने पुणे पोलीस दलाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहेत. राज्यातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा पुण्याला जास्त सुविधा दिल्या जात आहेत. मात्र असे असताही शहरात कोयता गँग दिसते. आता कोयता गँग दिसली तर, मग काही खरे नाही,’ अशा शब्दात अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना सज्जड दम दिला.
पुणे आणि आजूबाजूच्या गावात कोयता गॅंगने धुमाकुळ घातला आहे. या कोयता गॅंगची दहशत थांबवा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते असतानाही अजित पवार यांनी केली होती. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत कारवाई करण्याची मागणी केली होती. या कोयता गॅंगमुळे अनेक सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मागील अनेक दिवसांपासून नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
पुणे आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये कोयता गॅंगनने दहशत निर्माण केली आहे. या गॅंगमधील काही मुले अगदी तरुण आहेत. ही मुले परिसरातील अनेक रस्त्यावर सक्रिय आहेत. तरुण सोशल मीडियावर गुन्हेगारीशी संबंधित व्हिडीओ पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात. काही तरुण हॉटेल्सची बिले देत नाही, गाड्यांच्या काचा फोडतात, महिलांनादेखील दमदाटी करतात. त्यांच्या या कृत्यांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत थांबायला हवा. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली होती.
पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार , माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अनेक शंभराहून अधिक गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली होती. अमितेशकुमार यांनीही परिणामकारक कारवाई केली. त्यांंनी गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. धडाधड कारवाई करत शेकडो गुन्हेगारांना जेरबंद केले होते.
