भाजपाचे सतीश लोंढे केवळ ५५ तर विवेक यादव मतांनी ६२ मतांनी विजयी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शहराच्या विविध प्रभागांमध्ये किमान १७ उमेदवार असे आहेत जे २ ते ३ आकड्यांच्या फरकाने पराभूत झाले किंवा विजयी झाले. सतीश लोंढे विवेक यादव हे दोन आकडी मतांवर महापालिकेत पोहचले.
सर्वाधिक कमी मते असलेला प्रभाग क्रमांक १७ असून त्यामध्ये भाजपाचे सतीश लोंढे केवळ ५५ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे अशोक कांबळे यांचा पराभव झाला. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे विवेक यादव हे केवळ ६२ मतांनी निवडून आले. काॅंग्रेसचे अविनाश बागवे यांचा त्यांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक २३, नाना पेठ रविवार पेठमध्ये भाजपाच्या ऋतुजा गडाळे यांचा पराभव माजी नगरसेवक लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी १४१ मतांनी केला.
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ मध्ये राष्ट्रवादीचे रवी टिंगरे भाजपाच्या सुधीर वाघमोडे यांचा १३८ मतांनी पराभव करून विजय झाले.
प्रभाग क्रमांक ७, गोखलेनगर वैदुवाडी वाकडेवाडी प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या अंजली ओरसे यांनी भाजपच्या सायली माळवे यांचा २१६ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत हिंगणे खुर्द मध्ये राष्ट्रवादीचे सुरज लोखंडे यांनी भाजपच्या विनय बहुलकर यांचा २२८ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक १६ हडपसर सातववाडीमध्ये भाजपच्या पल्लवी सुरवसे यांचा माजी महापौर वैशाली बनकर यांनी ३४८ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक २२ कासेवाडी डायस प्लॉटमध्ये भाजपाचे संदीप लडकत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रफिक शेख यांनी ३५० मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीमध्ये राष्ट्रवादीचे स्वप्निल दुधाने यांनी त्यांनी ३९५ मतांनी भाजपचे कपिल मेंगडे यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक १६ हडपसर, सातववाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नितीन गावडे यांनी भाजपचे संदीप दळवी यांचा ४०४ मतांनी पराभव केला.
खडकवासला शिवणे धायरी प्रभाग क्रमांक ३३ मध्ये भाजपाचे सुभाष नाणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मते यांचा ५३९ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी, वैदुवाडीमध्ये भाजपाच्या पायल तुपे यांनी राष्ट्रवादीच्या संगीता तुपे यांचा ५६२ मतांनी पराभव केला. याच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद अलकुंटे यांचा भाजपचे प्रशांत तुपे यांनी ६२५ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन जय जवान नगरमध्ये काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांनी भाजपच्या अश्विनी भोसले यांचा ७५० साडेसामतांनी पराभव केला. तर याच प्रभागातून काँग्रेसचे कुणाल राजगुरू यांचा भाजपचे निलेश आल्हाट यांनी ८९७ मतांनी पराभव केला तर
प्रभाग क्रमांक ९, बाणेर पाषाण सुस मध्ये राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांनी भाजपचे लहू बालवडकर यांचा ९०३ मतांनी पराभव केला.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
