News Portal

कोण होईल पुण्याचा महापौर?

 

गणेश बिडकर यांचे नाव पडले मागे ?

 

 
पुणे: महापौर कोण होईल याविषयी महानगरपालिकेच्या भाजप वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. यापूर्वी महापौर पद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी असल्याने प्रबळ दावेदार असणाऱ्या गणेश बिडकर यांचे नाव मागे पडले आहे आहे.


सर्वसाधारण गटासाठी सध्या आरक्षण असल्यास पुढील सोडतीच्या वेळी त्या महानगरपालिकेत सर्वसाधारण गट वगळून अन्य गटासाठी आरक्षणाची सोडत काढली जाते. मंत्रालयात होणाऱ्या या सोडतीत प्रत्येक महानगरपालिकेची आरक्षणाची चिठ्ठी तयार केली जाते. त्यानुसार आरक्षण निश्चित होते.

राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी महापौर पदाचे आरक्षण न केल्याने आता सर्व २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण तातडीने करावे लागणार आहे.
आरक्षणाची सोडत ही चक्राकार पद्धतीने काढली जाते. त्यासाठी २००६ मध्ये राज्य सरकारने नियम तयार केले आहेत. समान संधीचे तत्त्व त्यासाठी वापरले जाते.

सर्वसाधारण पुरुष व महिला, ओबीसी पुरुष व महिला, अनुसूचित जाती, जमातीमध्ये अशाच पद्धतीने संधी दिली जाते. चक्राकार पद्धतीत आधीच्या वर्षी ज्या गटास संधी मिळते ते वगळून आरक्षण काढले जाते.

पुण्याचे महापौर पद गेल्या वेळी सर्व साधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव होते. मुरलीधर मोहोळ महापौर असताना सभागृह विसर्जित झाले. नंतर दीर्घ काळ प्रशासक राज महापालिकेवर होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांपूर्वीच भाजपचे महत्त्वाचे नेते गणेश बिडकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती .धीरज घाटे यांचे नावही आघाडीवर होते. मात्र ती आता मागे पडली आहेत. ओबीसी प्रवर्गातून श्रीनाथ भिमाले हेही दावेदार आहेत. तेही महापौर पदाचे प्रबळ दावेदार आहेत.

यंदा महिला नगरसेविका सभागृहात मोठ्या प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण झाल्यास सुशिक्षित, जाणकार नगरसेवकाचा शोध भाजपला घ्यावा लागणार आहे.