सखल हिंदू समाज संघटनेकडून निषेध
हिंदू समाजाच्या नेतृत्वावर चिखलफेक करण्याचा हा सुनियोजित आणि राजकीय स्टंट असून अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आता ठोस उत्तर दिले जाणार आहे. रुहीनाज शेख यांनी २४ तासांच्या आत जाहीर व बिनशर्त माफी मागितली नाही, तर सकल हिंदू समाज संघटना रस्त्यावर उतरून, लोकशाही मार्गाने, कायदेशीर पद्धतीने आणि संघटित शक्तीच्या जोरावर जोरदार आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
रुहीनाज शेख महिला असल्यामुळे आम्ही संयम दाखवत आहोत, कारण महिला भगिनींचा सन्मान करणे ही आमच्या संस्कृतीची ओळख आहे. मात्र हा संयम आमची कमजोरी समजू नये. हिंदू समाजाच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांना योग्य जागा दाखवणे आम्हाला चांगल्या प्रकारे जमते.
धर्म, स्वाभिमान आणि समाजहितावर होणारा कोणताही हल्ला आम्ही सहन करणार नाही. आता वेळ आली आहे की अशा अपप्रचार करणाऱ्यांना ठाम शब्दांत आणि ठोस कृतीतून उत्तर दिले जाईल, असे सखल हिंदू समाज संघटनेने म्हटले आहे.
