News Portal

२७ कुणबी मराठ्यांचा पुणे म्युन्सिपाल्टीवर झेंडा

विश्वास खोड 



पुणे : मराठ्यांना आरक्षण तसेच कुणबी मराठा असा निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेमध्ये कुणबी- मराठा प्रमाणपत्र असलेल्या २७ जणांनी अन्य मागासवर्गीय प्रवर्गातून नगरसेवक पटकावले आहे. ९ महिलांचा त्यात समावेश आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेनंतर कुणबी आणि मराठा या विषयाची चर्चा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाली. तथापि आजही प्रमाणपत्र  घेताना गरजू विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणाऱ्यांसाठी सढळ हाताने कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्याचे दिसून येते. 

कुणबी प्रमाणपत्र प्रामुख्याने मराठवाडा विभागात वितरित करण्यात आली आहेत कोकण भागामध्ये सुद्धा पूर्वी मराठ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र देशमुख आणि पाटील असे मराठा जातीमधील उप जात समूह मोठ्या प्रमाणात आहेत. अशा परिस्थितीमध्ये २७ जणांनी पुणे महानगरपालिकेवर कुणबी झेंडा फडकवला आहे.

नारायण गलांडे, हरिदास चरवड, कल्पना बहिरट तसेच स्मिता कोंढरे यांचा आणि बाबुराव चांदेरे या ५ माजी नगरसेवकांशिवाय अन्य सर्व नगरसेवक कुणबी-मराठा प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गातून निवडणूक रिंगणात उतरले. नगरसेवक आणि त्यांचा प्रभाग पुढीलप्रमाणे: 
1 -C
रेखा चंद्रकांत टिंगरे 
2-B 
हर्षल रमेश टिंगरे 
3-A
श्रेयस प्रीतम खांदवे 
3-B
अनिल दिलीप सातव 
4-B
रत्नमाला संदीप सातव 
5-A
नारायण मोहन गलांडे
 8-B
भक्ती अजित गायकवाड 
9-B
चांदेरे बाबुराव दत्तोबा
10-A
किरण दगडे पाटील
 11-A
हर्षवर्धन मानकर 
17-B
हेमलता मगर
 20-A
राजेंद्र शिळीमकर 
21-B 
सिद्धी शिळीमकर 
24-A
कल्पना बहिरट 
25-B
राघवेंद्र मानकर 
28-B
प्रिया गदादे पाटील
30-A
स्वप्नील दुधाणे 
31-A
दिनेश माथवड 
32-B
बराटे भारतभूषण 
34-A
हरिदास चरवड 
36-B
शैलजा भोसले 
37-A
किशोर उत्तम धनकवडे 
38-A
स्मिता सुधीर कोंढरे 
38-B
संदिप बेलदरे 
39-B
वृषाली सुनील कामठे 
40-B
बांदल निवृत्ती 
41-B