पुणे: 'पुणे ग्रॅंड सायकल टूर'साठी औंधच्या ब्रेमेन चौकात, बाजीराव रस्ता भागात अभिनव महाविद्यालय चौकात तसेच सी-लाई चौक, पाषाण रोड, मित्र मंडळ चौक व इतर मार्गांवर रस्त्यालगत पुणे महानगरपालिका उद्यान विभागामार्फत फुलांची आकर्षक सजावट व सुशोभीकरण करण्यात आले होते.
एरवी घाण, कचरा, थुंकीच्या पिचकाऱ्या, अतिक्रमणे यामुळे गजबजलेल्या रस्त्यांवर जणू काश्मीरचे बगिचे अवतरले आहेत असा भास होत होता. हे मोहक दृश्य पाहून पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आणि नेहमी रस्त्यांची अशीच सुव्यवस्था असावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलतर्फे आयोजित होणारी २.२ मल्टी स्टेज शर्यत भारतात पहिल्यांदाच आयोजित होत आहे. ४३७ किलोमीटर इतके या शर्यतीचे अंतर आहे. या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. शर्यतपटूंना पुण्याची सुखद हवा, वातावरण, संस्कृती अनुभवता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
२.२ टप्प्याची जगातली ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. जागतिक सायकलिंग संघटनेतर्फे आयोजित होणारी एंट्री लेव्हलची शर्यत आहे. शर्यतीत मिळणारे गुण ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातील. पुणे परिसरात होणाऱ्या या शर्यतीत ३५ देशांचे १७१ स्पर्धक आणि २९ संघ शर्यतीत सहभागी झाले आहेत.
.jpeg)

.jpeg)

