News Portal

साने गुरुजी मंडळाजवळील गटारी चेंबर अतिशय निकृष्ट


 पुणे: एक समान पातळीवर नसलेली सर्व रस्त्यावरील गटार चेंबर समान पातळीवर करण्याचे काम पूर्ण शहरात चालू असताना सुरु असलेली कामे आणि त्या नवीन बसवलेल्या चेंबरचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. 

चेंबर काही दिवसच झालेले आहेत बसवून पुन्हा ते मोठया प्रमाणात खचून अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. असेच एक निकृष्ट दर्जाच्या कामाचे हे बोलके उदाहरण आहे आंबिल ओढा पीएमसी काॅलनीजवळे.  भाजपचे पुणे शहराध्यक्ष यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाच्या जवळचे हे चित्र आहे. घाटे याच परिसरातील नगरसेवक आहेत.
त्यामुळे बाकी अन्य रस्त्यांवर काय परिस्थिती असेल याची कल्पना केलेली बरी!