News Portal

पुणे पालिकेने चुकीच्या पद्धतीने आकारलेला २६८ कोटी रुपये कर

 'आपले पुणे आपला परिसर' ची आमदारांना आवाज उठविण्यासाठी विनंती

 

पुणे: विधानसभा मतदारसंघांमधील मिळून ३२ गावे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट केली आहेत त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये समाविष्ट ३२ गावांतील मालमत्ता कर रचनेबाबत आवाज उठवावा, अशी मागणी आमदारांना करण्यात आली आहे.

'आपले पुणे आपला परिसर' चे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी 
आणि प्रशांत बधे यांनी विजय शिवतारे ,भीमराव तापकीर,चेतन तुपे पाटील, बापू पठारे, माऊली कटके, शंकर मांडेकर यांना पत्र लिहिले आहे.

उज्ज्वल केसकर यांनी सांगितले की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री  एकनाथजी शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या ३२ गावांच्या बाबत ग्रामपंचायत कर आकारणीच्या दुपटीने कर आकारणी करावी असे सांगितले आणि कर वसुलीला स्थगिती दिली. पुणे महानगरपालिकेने त्याप्रमाणे वसुली थांबवली.  तरीदेखील या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जवळपास २६८ कोटी रुपये कर भरणा महानगरपालिकेच्या तिजोरीत केला.

पुणे महानगरपालिकेने देखील या समाविष्ट गावांची कर आकारणी नियमांच्या अधीन राहून केलेली नाही. त्यामुळे त्याचा फेर विचार होणे आवश्यक आहे. कर आकारणी बाबत लोकांचा असंतोष चुकीचा नाही, असे आम्ही पत्रात म्हटले आहे.