देशभरात संघाच्या शाखांमध्ये सुमारे ६ हजारांची भर

संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
एकूण आकडेवारीनुसार, देशात गेल्या वर्षी ५१,७४० ठिकाणी ८३१२९ शाखा कार्यरत होत्या, त्या आता वाढून ५५,६८३ ठिकाणी ८८,९४९ शाखा झाल्या आहेत. अशा प्रकारे एका वर्षात ३,९४३ नवीन ठिकाणे जोडली गेली असून शाखांच्या संख्येत ५,८२० ने वाढ झाली आहे, असे जाधव यांनी सांगितले.