देहूरोड: संत तुकाराम महाराज बीजे निमित्ताने पालखीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची देहुगावात रिघ लागली होती. दुपारी १२ च्या सुमारास पालखी मंदिरातून वैकुंठाकडे पादुका असलेली पालखी नेण्यात आली. त्यावेळी फुलांचा वर्षाव करत भाविकांनी दर्शन घेतले.
संत तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या 'सदेह वैकुंठगमनाचा' पवित्र स्मृती दिन होय हा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला (फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया) देहू (पुणे) येथे मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. वारकरी संप्रदायात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
तुकाराम बीज निमित्ताने देहुमध्ये भाविकांची रिघ
Yogesh J
March 04, 2026
