या बैठकीत चेअरमन पदी चंद्रकांत दळवी, वाइस चेअरमन भगीरथ शिंदे, मध्य विभागीय चेअरमनपदी संजीव पाटील, दक्षिण विभागीय चेअरमनपदी संगीता प्रकाश पाटील, पश्चिम विभागीय चेअरमनपदी आमदार चेतन तुपे, उत्तर विभागीय चेअरमनपदी आमदार रोहित पवार आणि रायगड विभागीय चेअरमनपदी माजी आमदार बाळाराम पाटील यांची निवड करण्यात आली, सहसचिवपदी (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची, तर सहसचिव (माध्यमिक विभाग) म्हणून प्राचार्य बी. एन. पवार, तर ऑडिटरपदी प्राचार्य डॉ. राजेंद्र यांची फेरनिवड करण्यात आली.
चंद्रकांत दळवी यांची रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून फेरनिवड
May 23, 2026
Yogesh J
पुणे: रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी काल पुणे येथे संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मॅनेजिंग कौन्सिलची बैठक झाली.
