जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला; आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (Africa CDC) खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली.
भारत सरकारने नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि युगांडा येथे इबोला रोगाच्या उद्रेकाच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO), आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन (IHR), २००५ अंतर्गत, १७ मे २०२६ रोजी, या परिस्थितीला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) म्हणून निश्चित केले आहे. आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (Africa CDC) देखील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो आणि युगांडा येथे सध्या सुरू असलेल्या 'बुंदिबुग्यो स्ट्रेन इबोला विषाणू आजारा'च्या उद्रेकाला अधिकृतपणे 'खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' (PHECS) म्हणून घोषित केले आहे, असे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे
