Breaking News Latest updates loading...

छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र तळागळापर्यंत पोहोचवणार : प्रशांत धुमाळ

पुणे: छत्रपती संभाजी महाराजांचा लढाईचा केवळ इतिहास दाखवला गेला  परंतु त्यांच्या अनेक ग्रंथांचे आता प्रकाशन मराठा सेवा संघाच्या माध्यमातून होत आहे. यातून त्यांचे संस्कृत विषयक असलेले ज्ञान आता जगासमोर येत आहे ,अशी माहिती मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी सांगितली.


स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीराजांच्या जयंती निमित्त डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, माध्यमातून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अभिवादन कार्यक्रमासाठी 
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे मंदार बहिरट विराज तावरे अखिल शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समितीचे नीलेश इंगवले, राजेश कदम रोहित तेलंग  कार्यकर्ते उपस्थित होते.


धुमाळ यांनी सांगितले की नीतिमान, चरित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, पराक्रमी राजा म्हणून जगभरातील इतिहासकारांनी नोंद घेतलेल्या शिवपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास जनमानसात रुजविण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड कार्य करत आहे. आज तरुण पिढी संभाजी महाराजांचा इतिहासातून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रे काबीज करत आहे याचे श्रेय छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनमानसात पोहोचविण्यासाठी जीवाचे रान केलेल्या कार्यकर्त्यांना जाते. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन जोशी रोहित ढमाले अतुल ढगे यांनी सहकार्य केले.