Breaking News Latest updates loading...

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा

धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला  तात्पुरती स्थगिती


ठाणे
: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा  निर्णय घेतला आहे. 

 उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर अपलोड केला होता. यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती. २६ वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयल गंगा या  खाजगी विकासकाने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.