Breaking News Latest updates loading...

ज्येष्ठ टाळ वादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचे निधन

 


 पुणे :ज्येष्ठ टाळ वादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांनी ११ एप्रिल रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांचे अल्प आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्ती संगीतातील एक ख्यातनाम टाळवादक म्हणून ते प्रसिद्ध होते. ते चार पिढ्यांना अविरत टाळसाथ करणारे देशातील एकमेवाद्वितीय कलाकार मानले जातात. 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशींसोबतची साथ: माऊली टाकळकर यांनी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना तब्बल ४० वर्षे टाळांची साथसंगत केली. पं. भीमसेन जोशींच्या 'संतवाणी'च्या जगभरातील जवळपास २५०० हून अधिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी टाळ वाजवला आहे.