पुणे : केंद्रात व राज्यात भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा गाजावाजा करणारे भाजप आघाडीचे सत्ता येऊनही
पोलिस, महसूल , शिक्षण नगरविकाससह विविध खात्यांत लाचखोरीचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. लाचखोरीला आळा घालण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुरू केलेल्या बक्षीस योजनै प्रमाणे महाराष्ट्रात तसेच देशातही ही योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाने केली आहे.
या बाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोहीम सुरू केली आहे.
तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थलपती यांनी तळागाळातील शेतकरी, मजुरांसह सर्व समाजाची प्रशासनाकडुन होणारी आर्थिक पिळवणूक, लाचखोरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोणत्याही सरकारी, निमशासकीय तसेच शासकीय अनुदान घेणाऱ्या संस्थाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी एक हजार रुपयांचीही लाच मागितली तर तत्काळ तक्रार दाखल करावी. तक्रारदाराला तामिळनाडू सरकारच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे अशी योजना सुरू केली आहे.
मुख्यमंत्री होताच दहा दिवसांतच विजय थलपती यांनी ही लोकहिताची योजना सुरू केली आहे.
या बाबत माहिती देताना आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
भाजप आघाडीची भ्रष्टाचार मुक्त प्रशासन राबविण्याची मानसिकता नाही. त्यामुळे राज्यासह केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.शिक्षणा सारख्या महत्त्वाच्या विभागात टीएटी परिक्षांत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे त्याचा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या अशीच भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे महापालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थासह केंद्र व राज्याच्या विविध विभागात वाढले आहेत.
स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून विकासाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, लाचखोरीत सर्वात पुढे आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह महिला, सर्व नागरिकांची लाचखोरीच्या विळख्यातुन सुटका करण्यासाठी तामिळनाडू सरकार प्रमाणे एक हजार रुपयांची लाच मागितली तर संबंधित तक्रारदाराला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात यावे त्यामुळे लाचखोरीला आळा बसुन लाचखोरीना जरब बसणार आहे असे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी सांगितले.
लाचखोरीची तक्रार करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस द्यावे
May 22, 2026
Yogesh J
आम आदमी पक्षाची मागणी