News Portal

फडणवीस आणि वाघ


पुणे: भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या महानगरपालिकेसह अन्य महानगरपालिकांमध्ये सुध्दा विजयी  आगेकूच सुरू ठेवली आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी भाजपचे सख्य आहे. मूळ शिवसेना मात्र अनेक ठिकाणी गारद झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या निष्ठावंतांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे छायाचित्र सोशल मीडियावर झळकावले जात आहे. आक्रमक वाघ आणि शिवसेना हे समीकरण आहे. फडणवीस यांनी वाघाच्या शिल्पाच्या पाठीवर हात ठेऊन त्याला माणसाळवले, म्हणजे मूळ स्वभावाला वेसण घातली असा त्याचा अर्थ उपरोधिक प्रकारे पुढे आणला गेला आहे.