गोखले नगर मध्ये नीलेश निकम
पुणे: खडकवासला, शिवणे,धायरी प्रभाग क्रमांक ३३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे काकासाहेब चव्हाण निवडून आले. ते यापूर्वीही नगरसेवक होते. याच प्रभागातून या पक्षाच्या अनिता इंगळे या सुध्दा विजयी झाल्या. तर धनश्री कोल्हे, सुभाष नाणेकर हे भाजपचे उमेदवार अन्य गटातून विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १० मधून भाजपचे दिलीप वेडे पाटील २४, ७३४ मतांनी विजयी झाले.
गोखलेनगर प्रभागातून राष्ट्रवादीचे नीलेश निकम, दत्ता बहिरट, अंजली ओरसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या ठिकाणी भाजपाच्या निशा मनवतकर विजयी झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनल निवडून येण्याची संधी हुकली
नीलेश निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून स्थायी समितीचे अध्यक्ष होते. काका चव्हाण २००२ च्या निवडणुकीत बहुमताने निवडून आले होते. त्यानंतर २० वर्षांनी ते महापालिकेवर निवडून आले आहेत. या प्रभागात ५७. ८१ टक्के म्हणजे पुण्यात सर्वात जास्त मतदान झाले होते.
अन्य निकाल असे : प्रभाग ३६
• महेश वाबळे -१८१०४ भाजप ( विजयी )
सुशांत ढमढेरे - ११२४४ ( राष्ट्रवादी) पराभूत
प्रभाग ३६
• सई थोपटे - २०७९७ भाजप ( विजयी)
नीलम गांधी १६५५६ ( राष्ट्रवादी काँग्रेस) पराभूत
प्रभाग क्रमांक ३
• शैलजा भोसले २१७१५ ( विजयी)
अश्विनी कदम - १८ ६८३ ( पराभूत ) प्रभाग क्रमांक ३६
• विणा घोष - २१४३० भाजप (विजयी)
सुभाष जगताप १८१३४ पराभूत ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १० - दिलीप वेडे पाटील २४, ७३४ भाजप (विजयी)
शंकर केमसे -१२०८२ पराभूत
