जयश्री गजानन मारणे सुध्दा पराभूत
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप पराभूत झाले असून अविनाश बागवे आणि इंदिरा बागवे हे दोघे पती-पत्नी आघाडीवर होते. गोखले नगर मध्ये या पक्षाचे निलेश निकम आघाडीवर होते. बावधन भुसारी कॉलनी प्रभागातून जयश्री गजानन मारणे पराभूत झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे, कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. बोपोडीतून रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर पिछाडीवर असून
डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी प्रभागातून भाजपचे सुनील पांडे आघाडीवर होते.
काशेवाडी लायस प्लॉट प्रभागातून काँग्रेसचे रफिक शेख आघाडीवर होते.
गोखले नगर वाकडेवाडी प्रभागात भाजपच्या सायली माळवे आघाडीवर होते.गोखले याच प्रभागातून भाजपचे हरीश निकम आघाडीवर
सहकार नगर पद्मावती प्रभागातून भाजपच्या शैलीच्या भोसले आघाडीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम पिछाडीवर होत्या.
अप्पर इंदिरानगर प्रभागातून भाजपच्या वर्षा साठे आघाडीवर आहेत. याच प्रभागातून भाजपचे बाळा ओसवाल आघाडीवर होते. तर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक कदम आघाडीवर होते.
डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी प्रभागातून मंजुश्री खर्डेकर आघाडीवर भाजपच्या रूपाली पवार आघाडीवर या प्रभागात गुंड गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे या पिछाडीवर होत्या.
शिवणे खडकवासला धायरी प्रभागातून भाजपच्या धनश्री कोल्हे आघाडीवर होत्या.
मांजरी बुद्रुक केशवनगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित घुले आघाडीवर होते.
कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभागातून भाजपच्या वृषाली कामठे आघाडीवर होत्या.
कोंढवा येवलेवाडी प्रभागातून भाजपच्या अर्चना जगताप आघाडीवर होत्या.
कळस धानोरी लोहगाव प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे यांना मोठे मताधिक्य होते.