News Portal

कुणाल टिळक ७३०० मतांनी आघाडीवर

 

भाजपचे अनेक उमेदवार मोठ्या मत संख्येने आघाडीवर

पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट आघाडीवर असून याच प्रभागातून स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर १४५७५ , स्वरदा बापट ९१४६ तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक ७३०० मतांनी आघाडीवर होते. 

डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी प्रभागातून भाजपचे सुनील पांडे आघाडीवर होते. काशेवाडी डायस प्लॉट प्रभागातून काँग्रेसचे रफिक शेख आघाडीवर होते.

गोखले नगर वाकडेवाडी प्रभागात भाजपच्या सायली माळवे आघाडीवर होते. गोखले याच प्रभागातून भाजपचे हरीश निकम आघाडीवर

 सहकार नगर पद्मावती प्रभागातून भाजपच्या शैलीच्या भोसले आघाडीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम पिछाडीवर होत्या.

अप्पर इंदिरानगर प्रभागातून भाजपच्या वर्षा साठे आघाडीवर आहेत. याच प्रभागातून भाजपचे बाळा ओसवाल आघाडीवर होते. तर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक कदम आघाडीवर होते.

 डेक्कन जिमखाना हैप्पी कॉलनी प्रभागातून मंजुश्री खर्डेकर आघाडीवर आहेत.बावधन भुसारी कॉलनी प्रभागातून भाजपच्या रूपाली पवार आघाडीवर या प्रभागात गुंड गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे या पिछाडीवर होत्या.

शिवणे खडकवासला धायरी प्रभागातून भाजपच्या धनश्री कोल्हे आघाडीवर होत्या.

मांजरी बुद्रुक केशवनगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित घुले आघाडीवर होते.
 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभागातून भाजपच्या वृषाली कामठे आघाडीवर होत्या.

 कोंढवा येवलेवाडी प्रभागातून भाजपच्या अर्चना जगताप आघाडीवर होत्या.

कळस धानोरी लोहगाव प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे यांना मोठे मताधिक्य होते.