News Portal

सई थोपटे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची नगरसेवक


पुणे : सहकार नगर पर्वती प्रभाग ३६ मधून भाजपची कु.सई प्रशांत थोपटे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची नगरसेविका म्हणून पुणे महानगरपालिकेत निवडून आली आहे. ती २२वर्षांची आहे.

वानवडी साळुंके विहार निवडणूक निकाल जाहीर झाला असून प्रशांत दादा जगताप (काँग्रेस) साहिल केदारी (काँग्रेस) विजयी झाले आहेत. तर अन्य दोन जागांवर कालिंदी पुंडे (भाजपा) कोमल शेंडकर (भाजपा) विजयी झाल्या आहेत