News Portal

सायकलवर फिरणारे, पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

 

पुणे: पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला ऊर्फ काका यांचे कर्करोगाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. महापौर असताना त्यांनी पुण्यातील प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याची कल्पना मांडली. यावर टिका होऊनही महापौर पदाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी स्वतः अग्निशमन दलाच्या वाहनातून पाणी टाकून रस्ता धुतला होता. दगडूशेठ गणपतीचा मंडप असतो तो रस्ता पाण्याने धुवून स्वच्छ केला. ते तेथेच राहत असत. अखेरच्या दिवसात ते  आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे संचालक होते. दुपारी सायकलवरून जाताना ते सदाशिव पेठेत दिसत.

पुणे महापालिकेत गिरीश बापट म्हणजे G अंकुश काकडे A आणि शांतिलाल S सुरतवाला काका त्यातील भाऊ आणि काका हे दोन तारे निखळले. Gas असे या त्रिकुटाला नाव होते.

 सुरतवाला यांनी महापौर असताना नाटकात भूमिका केली होती. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काॅंग्रेसतर्फे निवडणूक लढवली तेव्हा हेलिकॉप्टर मधून प्रचार पत्रे उधळण्यामुळे ते चर्चेत आले होते.