News Portal

'ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव ' : वारजे पाॅप्युलरनगर मध्ये घोषणाबाजी

निवडणुका  बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलन


पुणे :  महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक ३२-वारजे पाप्युलरनगर मधील सर्व उमेदवारांच्या वतीने भारतीय जनता पार्टी वगळता सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टी,आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (शिंदे गट) व अपक्ष उमेदवार या सर्वांनी या आंदोलनात सहभाग घेतला. ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देऊन आंदोलनाची सुरुवात झाली.

आंदोलनाचे प्रास्ताविक समाजवादी पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य व प्रभाग क्रमांक ३२-वारजे पाप्युलरनगर मधील उमेदवार विनायक लांबे यांनी केले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी चे डाॅ. सोमनाथ पोळ यांनी आपले विचार व्यक्त केले. आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष व प्रभाग क्रमांक ३२-वारजे पाप्युलरनगर मधील उमेदवार माननीय नीलेश वांजळे यांनी मतमोजणी केंद्राच्या आत काय गोंधळ झाला, याचे कथन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा धुमाळ यांनी मतमोजणीच्या ठिकाणी मशीन अदलाबदली बाबत माहिती दिली. लोकांनी येऊन सांगितले कि तुम्हाला मते दिलीत मग ही मते कुठे गेली कुणी चोरली ?असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिव बराटे यांनी व्यक्त केले.

 निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांनी मिळून या महाराष्ट्र व पुण्यात लोकशाही व संविधानाचा खून केला असे समाजवादी पार्टी पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस व प्रभाग क्रमांक ३२-वारजे पाप्युलरनगर मधील उमेदवार दत्ता पाकिरे यांनी आरोप केला. तसेच पुण्यातील सर्वंच ठिकाणी निवडणूक आयोग व भारतीय जनता पार्टीने मतमोजणीचा घोळ केलेला आहे, असेही मत व्यक्त केले.

मनसेचे उमेदवार गणेश ऊर्फ बाबा धुमाळ व केशर प्रविण सोनावणे व प्रविण सोनावणे आणि मनसेचे कार्यकर्ते वारजे येथील मनसेचे नेते कैलास भाऊ दांगट यांनी ईव्हीएम हटवले पाहिजे व येथून पुढील निवडणूका या बॅलेट पेपरवरच घेतल्या तरच सर्वसामान्यांना न्याय मिळेल, अशी प्रत्येक उमेदवाराने मागणी केली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर कांबळे, मनसेचे नाना धुमाळ, समाजवादी पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंतराव कोळी, देवा पाकिरे, बलराम यादव,अपक्ष उमेदवार कांचन कदम, सदाशिवराव शिंदे,रिपब्लिकन पार्टी चे दत्ता नेटके  , रिपब्लिकन सेना व शिवसेनेचे (शिंदे गटाचे) अजय भालशंकर, वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत घोडके, आम आदमी पार्टीच्या भोसले ताई,व त्यांचे कार्यकर्ते,  उपस्थित होते.