भारतीय जनता पक्षाची फ्लेक्समुक्त पुण्याची घोषणा हवेतच विरली आहे. खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अनधिकृत फ्लेक्स राजकीय लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता.
फ्लेक्स लावून शहर विद्रूप केल्यास त्यासाठी विद्रूपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तथापि आमदार, खासदार, मंत्री यांच्या कार्यक्रमांचे किंवा वाढदिवस किंवा निवड नियुक्तीचेही फलक शहरभर दिसून येतात.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रोडवरील राजाराम पूल चौकात अनधिकृत जाहिराती लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणारा फलक लावला आहे. मात्र त्या शेजारीच अनधिकृत बॅनर लावलेले दिसत होते.
विशिष्ट चौक किंवा रस्त्यांवर ठरावीक राजकीय कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांचे फ्लेक्स लावले जातात. काही मंडळांनी आपापल्या भागात पक्के मचाण उभारुन व्यावसायिक जाहिरातदारांची सोय करुन कमाई सुरू केल्याचे दिसते. तरीही अनेक भागात महानगरपालिकेची बोटचेपी भूमिका असून किती गुन्हे दाखल केले आहेत याची माहिती पुढे आणली जात नाही.
ज्यांनी किंवा ज्यांच्या समर्थकांनी फ्लेक्स लावले आहेत त्यांच्यावर आणि ते लावणाऱ्या फ्लेक्स कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी महापालिका स्वतः विद्रूपीकरण दूर करण्यासाठी मनुष्यबळ खर्ची पाडत असल्याने पुणेकरांमध्ये नाराजी आहे.
िद्रूपीकरण करणार नेते, कार्यकर्ते फ्लेक्स काढून टाकणार पुणे मनपा,!
Yogesh J
February 23, 2026
पुणे: महापौर नियुक्ती नंतर शहरात जागोजागी अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर अनेक आठवडे जागीच आहेत. ज्यांनी किंवा ज्यांच्या समर्थकांनी फ्लेक्स लावले आहेत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी महानगरपालिका इतरांनी केलेले विद्रूपीकरण स्वतः मनुष्यबळ लावून दूर करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो आहे.