पुणे: महानगरपालिकेच्या वतीने रस्ते झाडण कामासाठी वेगवेगळ्या ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. अनेक भागांत कंत्राटी कामगारांमार्फत रस्ते साफसफाई केली जाते.
परंतु स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात मोठी असमानता आहे.
रस्ते सफाईच्या निविदा दरवर्षी किंवा ठराविक कालावधीसाठी बदलत असल्याने ठेकेदारांची नेमकी संख्या व वेतनाची नेमकी रक्कम वेळोवेळी होणाऱ्या किमान वेतन बदलांमुळे बदलू शकते. शिवाय किती किलोमीटर अंतरावरील सफाईचा ठेका घेण्यात आला आहे त्यानुसार ठेकेदाराला दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची व त्यामुळे कामगारांना मिळणाऱ्या वेतनातही तफावत आहे.
पुणे महानगरपालिकेतर्फे १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते सफाईसाठी कंत्राटी पद्धतीने विविध ठेकेदारांची नियुक्ती केली जाते, ज्यांच्याद्वारे हजारो कर्मचारी काम करतात. महापालिकेत सुमारे साडेसात हजार कर्मचारी सफाईचे काम करत असून, कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन आणि लाभ मिळणे बंधनकारक आहे, ज्याची तपासणी प्रशासनाकडून केली जाते किंवा कसे याबद्दल शंका आहे.
सिध्दीविनायक ग्रुपकडून कर्वेनगर भागात सुमारे ५०० कर्मचारी आहेत. त्यातील एकाने २५ हजार रुपये वेतन दिले जाते. तथापि २२ वर्ष काम करत असूनही आपण कायमस्वरूपी होऊ शकलो नाही अशी तक्रार केली. तर 'स्वच्छ' संस्थेच्या सफाई कामगारांना सुमारे ६० ते ७० हजार रुपये वेतन दिले जाते.
पुणे महापालिकेतर्फे रस्ते आणि शहराच्या स्वच्छतेसाठी रात्रीच्या पाळीत सुमारे १,४७२ हून अधिक सफाई कर्मचारी तैनात असतात
, तर एकूण सफाई कर्मचाऱ्यांची संख्या १२,००० पेक्षा जास्त असल्याचेही अहवाल आहेत. शहरात रस्ते सफाईसाठी प्रामुख्याने यांत्रिक पद्धतीचा (Mechanized Cleaning) वापर केला जात असून, मोठ्या रस्त्यांसाठी विविध खाजगी ठेकेदारांना कंत्राट देण्यात आले आहे.
४७२ हून अधिक कर्मचारी रात्रीच्या पाळीत काम करतात आणि एकूण १२,३५० सफाई कर्मचारी आहेत. १८ मीटरपेक्षा रुंद रस्ते साफ करण्यासाठी ३ क्षेत्रांमध्ये निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. रात्रपाळीत २१३ वाहने वापरली जातात. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, ४० किलोमीटरहून अधिक रस्ते यांत्रिकी पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
पुण्यात रस्ते सफाई करणाऱ्या कामगारांच्या वेतनात मोठी तफावत
Yogesh J
February 20, 2026
