News Portal

सारे श्रेय ॲड. मिलिंद पवार यांचे

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या जयंतीदिनी मी व किशोर विरोधातील एक तपा पेक्षाही अधिक जुन्या संवेदनशील फौजदारी खटल्याचा निकाल केवळ ॲड. मिलिंद पवार व सहकाऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वकिली मांडणीमुळे तसेच बुध्दी चातुर्यामुळे आमच्या बाजूने लागला आहे . ही बाब आमच्या सह सर्वच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना विशेष आनंद व प्रेरणा देणारी आहे. न्यायाधिशांनी आम्हाला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, असे सांगताच माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले '' आम्ही जवळपास ही केस विसरलो होतो पण  ॲड. मिलिंद पवार यांनी सामाजिक जाणिवेतून सर्वच प्रकरण कायदेशीर अभ्यास करून लढवले. महाराष्ट्र व देशभरातील सहकारी अभिनंदन करत आहेत. बरेच वर्षांनंतर आम्हालाही एवढे अभिमानास्पद दिवस आले आहेत. त्याचे शंभर टक्के श्रेय केवळ पवार व सहकाऱ्यांना जाते. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला केवढे मोठे बळ देता येते हे आपल्या कृतीतून सिद्ध झाले.''