पुणे : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे( दौंड ) उपाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील (आंबेगाव) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वाधिकार देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर याच पक्षाचे पदाधिकारी होणार हे निश्चित होते.