भाजप नगरसेवकाचा मुलगा गजाआड
मुंबई: नाशिक मधील लैंगिक अत्याचाराची मालिका विस्तार पावत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा पोलिसांनी सोमवारी सकाळी २० वर्षीय सोहम सुशांत नाईक याला अटक केली. २५ ते ३० अल्पवयीन मुलींचा समावेश असलेल्या एका कथित लैंगिक गैरव्यवहारावरून (सेक्स स्कँडल) उसळलेल्या प्रचंड जनक्षोभानंतर ही अटक करण्यात आली. मादेगाल-काकोरा येथील रहिवासी आणि कुर्चिरेम येथील भाजप नगरसेवकाचा मुलगा असलेल्या नाईकला, नागरिक आणि स्थानिक नेत्यांच्या जमावाने पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले.
प्रकरण उजेडात कधी आले?
हे प्रकरण गेल्या आठवड्यात समोर आले; जेव्हा सोहम सुशांत नाईक याने एका सामाजिक कार्यक्रमात आपल्या सहकाऱ्यांना पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून, आपल्या कृत्यांबद्दल कथितरित्या बढाई मारली. दक्षिण गोव्यात लैंगिक शोषणाच्या चित्रिकरणाबाबतच्या अफवा पसरू लागल्याने, स्थानिक तणाव शिगेला पोहोचला. तथापि, या प्रकरणाबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण गोव्यात सुरू होती. हे प्रकरण एका स्थानिक भाजप नगरसेवकाशी संबंधित असल्याने, कारवाईची मागणी करण्यासाठी स्थानिक नागरिक रविवारी रात्री 'कुडचडे पोलीस ठाण्यासमोर जमले. अखेरीस, पोलिसांनी त्या नगरसेवकाचा मुलगा असलेल्या सोहम नाईक याला ताब्यात घेतले.
गोव्यातही २५ ते ३० अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ?
Yogesh J
March 23, 2026