पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार ,ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदीया यांना डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे.
त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतिश देसाई यांनी कळविले आहे. पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे ,सलग ३७ वर्षे संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेर ह्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला.
अवघे मोगल साम्राज्य हादरवून टाकणाऱ्या बालशिवाजीची ,सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती या नगरीच्या ग्रामदैवतासह वैशिष्ट्यपूर्ण अशा पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे. रुपये दोनलक्ष रकमेची थैलीही सन्मानित पुणेकरास दिली जाते.
ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदीया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
Yogesh J
March 22, 2026
