Breaking News Latest updates loading...

पुणे महानगरपालिकेत सल्लागारांचा नाहक सुळसुळाट

 

पुणे: महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञ इंजिनियर असताना सध्या सल्लागारांचा सुळसुळाट झालेला आहे. प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका आहे. सल्लागार संस्थेकडे तज्ज्ञही नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात. 

'आपले पुणे आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेचे 
उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी ही बाब पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

केसकर यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञ इंजिनियर  असताना सल्लागार का नेमले जातात हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी ढकलतो  आहोत.

पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे आणि त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ संपेल, असे संबंधित पत्रात 'आपले पुणे आपला परिसर' ने म्हटले आहे.