पुणे महापालिका अंतर्गत मिळकतींचे 'जी आय एस मॅपिंग' चे काम २०१६ साली 'सार आय टी रिसोर्सेस प्रा. लिमिटेड' या कंपनीस देण्यात आले. या कंपनीने चुकीच्या पद्धतीने काम करून हजारो पुणेकरांची मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द केली. यातून नागरीकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आणि गेली चार वर्षे या चुका निस्तरताना नागरीक आणि मनपा प्रशासन दोघांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पीटी ३ फाॅर्म भरुन मिळकत करात दुरुस्ती करण्याचे काम आजही सुरुच आहे. महापालिकेने नेमलेल्या समितीने या कंपनीने केलेल्या कामाचा छोटा सर्व्हे केला होता आणि या कंपनीने ८८ टक्के ठिकाणी चुका केल्याचा अहवाल या समितीने दिला होता व त्याआधारे महापालिकेने सदरहू कंपनीचे बिल , सुरक्षा ठेव व बॅंक गॅरंटी मिळून जवळपास १२ कोटी रुपये जप्त करण्याचा निर्णय घेतला.
अशा कंपनीला महापालिकेने पुन्हा कोणतेही काम देणे अपेक्षित नसताना पुणे महापालिकेने प्रशासक राज संपता संपता फेब्रुवारी २०२६ मध्ये या कंपनीला पुणे शहरातील वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थायी समितीने अशा सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये सदरहू कंपनीचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
SAAR IT Resources Pvt Ltd ही २००८ मध्ये स्थापन झालेली, मुंबईस्थित एक अग्रगण्य ITES आणि तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी GIS, सल्लागार सेवा, सॉफ्टवेअर विकास, आउटसोर्सिंग आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (Business Process Management) यांसारख्या सेवा पुरवते.
आधी चुकीचे काम करणाऱ्या कंपनीस पुण्यात वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम
April 28, 2026
Yogesh J
पुणे: पुणे शहरातील वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय 'सार आय टी रिसोर्सेस प्रा. लिमिटेड' SAAR IT Resources Pvt Ltd या कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करायला लावणाऱ्या या कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट कशासाठी? असा प्रश्न 'सजग नागरिक मंच' चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी स्थायी समितीला उपस्थित केला आहे.