पुणे : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान वाघोली पोलिसांनी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले. तसेच सरकार पक्षाचा युक्तिवादही न्यायालयात सादर करण्यात आला.
विकास लवांडे यांच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आदेशासाठी उद्याची तारीख निश्चित केली आहे.
त्यामुळे आता विकास लवांडे यांच्या जामीन अर्जावर न्यायालय उद्या आदेश पारित करणार आहे.
