पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील 'दगडूशेठ हलवाई गणपती' ट्रस्टला राज्य सरकारने 'अ' श्रेणीचा पर्यटन क्षेत्र दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समाज माध्यमातून प्रसारित केली आहे.
‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर संस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. यामुळे देशभरातून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अ दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रयत्नांना यश मिळाल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे पुण्यातील स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय, पर्यटन सेवा आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. गणेशोत्सवासह वर्षभर दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पुण्यात येत असतात.
