शनिवार आणि रविवारच्या दिवशी या उद्यानात गर्दी होते. हे सुंदर उद्यान नागरिकांनी आणि विशेषत: लहान मुलांनी फुलून जाते. पाच रुपये प्रवेश शुल्क व वाहनतळ शुल्क द्यायला प्रचंड गर्दी होते. बागेसमोरच सिग्नल असून तेथून यु टर्न घेणाऱ्यांमुळे आणि सिग्नल जंप करून सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर
यांनी ही परिस्थिती पाहून उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे व स्थानिक नगरसेवक तसेच तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेकदा कारवाई करून ही परिस्थिती " जैसे थे " असल्याचे निदर्शनास आले.
खर्डेकर यांनी सांगितले की याठिकाणी असणाऱ्या भेळ, पाणीपुरी सह इतर हातगाड्यांना, फुगे व तत्सम पदार्थ विक्रेत्यांना शिस्त लावणे गरजेचे असून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी अशी आग्रही मागणी करत आहे. बागेत येणाऱ्यांना खाद्यपदार्थ आवश्यक आहेतच, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज उद्याना प्रमाणे आत मध्ये किंवा पदपथा लगत यांची व्यवस्था केली जावी जेणेकरून कोणाच्या पोटावर पाय येणार नाही.
पु. ल. देशपांडे उद्यानाच्या बाहेरील विक्रेत्यांच्या अनियंत्रित वावरामुळे त्रास
May 17, 2026
Yogesh J
पुणे: सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात प्रवेश करायला व बाहेर पडायला एकच प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वारा लगत अगदी रस्त्यावर असलेल्या विक्रेत्यांच्या अनियंत्रित वावरामुळे अडचणी येत आहेत. अनधिकृतरित्या हातगाडी सरळ उभी करून व पथारी पसरून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
