News Portal

भारताने इतिहास घडवला

 भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक अंतिम सामना: जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट घेतल्या


भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक अंतिम सामना: जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट घेतल्या

पुणे: रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या सहा विकेट्स घेवून भारत आघाडीवर असल्याने पुणेकरांनी रात्री साडेदहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. सामना जिंकल्यावर फटाक्यांची दिवाळी साजरी करण्यात आली.

संपूर्ण शहरात सायंकाळी अत्यंत तुरळक रहदारी होती. अनेक ठिकाणी पडद्यावर सामन्याचे प्रक्षेपण केले जात होते. रात्री विजय दृष्टीपथात येताच एकच जल्लोष सुरू झाला.

२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड १५ षटकांनंतर १३९/६ असा संघर्ष करत होता. कर्णधार मिशेल सँटनर आणि जेम्स नीशम क्रीजवर होते. अक्षर पटेलने दोन बळी घेतले आहेत, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

 यापूर्वी, भारताने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात २० षटकांत २५५/५ असा मोठा विक्रम नोंदवला होता. संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावा केल्या होत्या, ज्यामुळे टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली. अभिषेक शर्माने शेवटपर्यंत आपले सर्वोत्तम प्रदर्शन वाचवले आणि केवळ १८ चेंडूत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. इशान किशन (२५ चेंडूत ५४ धावा) आणि शिवम दुबे (८ चेंडूत २६ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारत टी२० विश्वचषक विजेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचे, तो तीनदा जिंकण्याचे आणि घरच्या मैदानावर जिंकण्याचे लक्ष्य ठेवत होता. दुसरीकडे, न्यूझीलंड त्यांच्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी उत्सुक होता. अखेर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला.

भारत इतिहासाच्या उंबरठ्यावर

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक अंतिम सामना: जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट घेतल्या

 


 


पुणे: रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या सहा विकेट्स घेवून भारत आघाडीवर असल्याने पुणेकरांनी रात्री साडेदहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू केली.

संपूर्ण शहरात सायंकाळी अत्यंत तुरळक रहदारी होती. अनेक ठिकाणी पडद्यावर सामन्याचे प्रक्षेपण केले जात होते. रात्री विजय दृष्टीपथात येताच एकच जल्लोष सुरू झाला.

२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड १५ षटकांनंतर १३९/६ असा संघर्ष करत होता. कर्णधार मिशेल सँटनर आणि जेम्स नीशम क्रीजवर होते. अक्षर पटेलने दोन बळी घेतले आहेत, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

 यापूर्वी, भारताने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात २० षटकांत २५५/५ असा मोठा विक्रम नोंदवला होता. संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावा केल्या होत्या, ज्यामुळे टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली. अभिषेक शर्माने शेवटपर्यंत आपले सर्वोत्तम प्रदर्शन वाचवले आणि केवळ १८ चेंडूत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. इशान किशन (२५ चेंडूत ५४ धावा) आणि शिवम दुबे (८ चेंडूत २६ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारत टी२० विश्वचषक विजेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचे, तो तीनदा जिंकण्याचे आणि घरच्या मैदानावर जिंकण्याचे लक्ष्य ठेवत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड त्यांच्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी उत्सुक आहे.

महापालिका भवनाजवळच अनेक वर्षांपासून भर चौकात अतिक्रमण

दुर्लक्षाचा फायदा घेऊन पत्रा शेड मध्ये अनेकांना निवारा 


 


पुणे: अतिक्रमणे हटवण्याबाबत भीम गर्जना करणाऱ्या महानगरपालिकेच्या अगदी जवळच भर चौकात शेडवजा अतिक्रमण झाले असून रस्ता वाहतूक पोलिसांच्या बॅरिकडने अडवून पत्र्याची खोली बांधण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तेथे परप्रांतीयांचे वास्तव्य आहे. 

महानगरपालिका भवनापासून जुन्या तोफखान्याकडे जाणाऱ्या चौकातली ही परिस्थिती आहे. भर चौकात एका मंडळाचे पक्के बांधकाम असलेले देऊळ आहे. त्याच्या भिंतीचा आडोसा घेऊन लोखंडी बॅरिकेड्सनी ५ ते ६ फूट रुंदीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. खेटून असलेल्या ताडी अड्ड्याच्या पत्र्याच्या आडोशाने चारही बाजूंनी पत्रे उभारुन एक मोठी खोली उभारण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

संबंधित मंडळाने घेतलेल्या नळावर चोवीस तास पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. समोरच नदीपात्रालगत सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. पीएमपीएमएलचे मोठे स्थानक तेथे आहे. त्यामुळे महापालिका भवनाच्या नाकाजवळ बेकायदेशीर खोली बांधणाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांचे फावले आहे. 

दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार, शहरातील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. मात्र, बांधकामांवर कारवाई करताना  अनेकांची घरे पाडली जात आहेत. अगदी चार ते पाच मजल्याच्या इमारती पाडल्या जात आहेत. तथापि महापालिकेच्या नाकावर टिच्चून अनेक वर्षांपासून असलेली अशी अतिक्रमणे 'जैसे थे' असल्याने सार्वजनिक रस्ता अडवला जात आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या लोखंडी बॅरिकेड्सचाही अडथळा अतिक्रमणासाठी उपयोगी आणला जात आहे. वाहतूक पोलिसांकडील बॅरिकेड्सची संख्या आणि इतस्ततः पडलेले बॅरिकेड्स हा स्वतंत्र विषय आहे.

महाराष्ट्र शासन आता 'चेअरमन' उद्योगातही!




पुणे: महाराष्ट्र शासन आता 'चेअरमन' उद्योग या नावानेही कारागिरांचा विकास करत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने हा नवीन उपक्रम सुरू झाल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील अर्थात 'एसटी'वरील एका जाहिरातीवरून दिसून आले. 

राज्य पातळीवरून जिल्हा किंवा शहर पातळीवर पदांची खैरात शासनातर्फे केली जाते त्यामध्ये चेअरमन अर्थात अध्यक्ष पदाला प्रचंड महत्व आले आहे. अशा परिस्थितीमध्ये खुद्द शासनाची 'चेअरमन उद्योग' अशी जाहिरात पुढे आल्याने राजकीय इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

वास्तव काय आहे?

काही काळापूर्वी विडंबनात्मक अथवा उपहासात्मक बातम्या किंवा लेख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असत. तसाच प्रकार याही बातमीच्या मजकुराबाबत आहे. वास्तवामध्ये एस.टी. वर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'अनुसुचित जाती मधील चर्म उद्योगातील कारागिरांचा विकास ' या ऐवजी 'अनुसुचित जाती मधील चेअरमन उद्योगातील कारागिरांचा विकास' अशी चूक झाली आहे. 


एसटी महामंडळाच्या बस संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतात. अशा परिस्थितीत किती बसगाड्यांच्या माध्यमातून असा चुकीचा मजकूर प्रसारित होत आहे, हे समजण्यास मार्ग नाही. नुकत्याच साजऱ्या झालेल्या मराठी दिनाचा पार्श्वभूमीवर शासनाच्या जाहिराती अर्थाचा अनर्थ करणाऱ्या असतात, हे या उदाहरणावरून दिसून आले.

या जाहिरातींवर किती लाख रुपये खर्च झाला आहे? या जाहिरातीचा मजकूर कोणी तपासला आणि अंतिम केला? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत महाराष्ट्राला 'चेअरमन' उद्योग सहन करावा लागणार आहे हे नक्की!


लोकशाही टिकवण्यासाठी काॅंग्रेस कार्यकर्ते निवडणुकांना सामोरे

जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांचे वक्तव्य 

 

 

पुणे: मावळ व  मुळशी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील नागरी समस्या व प्रश्न हातात घेऊन पक्ष संघटनेला संजीवनी प्राप्त करून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील, जेष्ठ नेते कमलाकर सातव, प्रदेश प्रतिनिधी आकाश मोरे, शंकरराव दांगट, संदीप नायकरे, चंद्रकांत गोरे, संजय अभंग ,आनंद पवार, मावळ  तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, संपर्क प्रमुख राजू शिंदे, उपाध्यक्ष राजीव फलके, मुळशी तालुकाध्यक्ष सुरेश पारखी, उपाध्यक्ष सतीश चांदेरे, अशोक मातेरे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार लोकशाही टिकवण्यासाठी या निवडणुकीत सामोरे गेले. अशा प्रतिकूल परिस्थितीत लढलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष सदैव पाठीशी राहील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

महाराष्ट्रावर ९,३२,२४२ कोटी कर्जाचा बोजा

मुंबई: २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचे सार्वजनिक कर्ज ९.३२ लाख कोटींपर्यंत वाढेल, जे मागील वर्षीच्या ८.३९ लाख कोटींपेक्षा १८.३ टक्क्यांनी वाढले आहे.


गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात ही आकडेवारी उघड झाली.
तथापि, कर्ज असूनही, राज्याचा आर्थिक विकास दर ७.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. कर्जाचा बोजा असूनही, महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. कर्जाची रक्कम ९,३२,२४२ कोटी (अर्थसंकल्पीय अंदाज) आहे, तर व्याज देय ६४,६५९ कोटी आहे.

सीआयडीकडून 'व्हीएसआर व्हेंचर्स'चा मालक व्ही.के. सिंग याची चौकशी

मुंबई: महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी व्हीएसआर व्हेंचर्सचे मालक व्हीके सिंग यांची चौकशी केली. ही कंपनी २८ जानेवारी रोजी बारामती येथे ज्यांचे विमान कोसळले होते, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिंग यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, तपासाचा मुख्य उद्देश हा अपघात कट रचण्याचा होता की गुन्हेगारी निष्काळजीपणाचा. विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) च्या प्राथमिक अहवालात दृश्यमानता कमी असणे आणि धावपट्टीची जीर्ण स्थिती हे अपघाताचे कारण असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, राजकीय वादही तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) आमदार रोहित पवार यांनी आरोप केला आहे की कोणीतरी व्हीएसआर व्हेंचर्सचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.